पुढं खासा उदेभान उभा ठाकलेला
तरी सिंहानं गनिमाचा खुर्दा उडवला
पन राजपुताचा घाव वर्मी लागला
अन् स्वराज्यासाठी प्रान सोडला
गातो नरवीराच्या पराक्रमाला हो जीs जीs जीs
मानहानीकारक पुरंदरचा तह, त्यातल्या अटींनुसार ते २३ किल्ले, काही लक्ष होनांचा प्रदेश द्यावा लागला, ऐन उमेदीत आलेलं हिंदुपदपातशाहीचं स्वराज्य मातब्बर मुघल मनसबदार मिर्झाराजे जयसिंग यांच्या अचानक धडकेमुळे कोलमडून गेलं. त्याच स्वराज्याची पुनर्उभारणी करण्याची आवश्यकता होती. काही गड किल्ले घेतलेही पण अजूनही अजेय असा कोंढाणा आणि त्याच्यावर फडकणारा मुघली परचम् जिजाऊ माँसाहेब आणि सिउबाराजांच्या डोळ्यांत कुसळाप्रमाणे सलत होता. महाराजांचा बालपणीचा सवंगडी सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा घेण्याचं कबूल केलं आणि ४ फेब्रुवारी १६७० च्या हल्ला करून प्राणार्पण करून गड काबीज केला.
तरी सिंहानं गनिमाचा खुर्दा उडवला
पन राजपुताचा घाव वर्मी लागला
अन् स्वराज्यासाठी प्रान सोडला
गातो नरवीराच्या पराक्रमाला हो जीs जीs जीs
मानहानीकारक पुरंदरचा तह, त्यातल्या अटींनुसार ते २३ किल्ले, काही लक्ष होनांचा प्रदेश द्यावा लागला, ऐन उमेदीत आलेलं हिंदुपदपातशाहीचं स्वराज्य मातब्बर मुघल मनसबदार मिर्झाराजे जयसिंग यांच्या अचानक धडकेमुळे कोलमडून गेलं. त्याच स्वराज्याची पुनर्उभारणी करण्याची आवश्यकता होती. काही गड किल्ले घेतलेही पण अजूनही अजेय असा कोंढाणा आणि त्याच्यावर फडकणारा मुघली परचम् जिजाऊ माँसाहेब आणि सिउबाराजांच्या डोळ्यांत कुसळाप्रमाणे सलत होता. महाराजांचा बालपणीचा सवंगडी सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा घेण्याचं कबूल केलं आणि ४ फेब्रुवारी १६७० च्या हल्ला करून प्राणार्पण करून गड काबीज केला.
याच सर्वश्रुत पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या अजय देवगण यांचा अभिनय असलेल्या "तान्हाजी- द अनसंग वॉरीअर" (Tanhaji - the unsung warrior) या सिनेमानं २०२० या वर्षाची दणदणीत सुरुवात केली आहे. १०० कोटी ₹ च्या क्लब (100 crore club) मध्ये वर्णी लावून या वर्षीचा पहिला ब्लॉकबस्टर होण्याचा मान मिळवला आहे. भन्साळी कॅम्पचे प्रकाश कपाडिया आणि सोबतीला ओम राऊत यांनी कथा- पटकथा जबरदस्त लिहिली आहे. तसंही ऐतिहासिक कथेवर सिनेमा बनवणं खूप जोखमीचं काम आहे. इतिहासातला आवश्यक तोच घटनाक्रम निवडणे आणि योग्य सृजनस्वातंत्र्य (cinematic liberty) घेऊन पटकथा वेगवान ठेवण्याचं काम उत्तम केलं आहे. वीररसाला मध्यभागी ठेऊन बाकी रसांच प्रसंगानुरूप मिश्रण खूप छान आहे, आणि बॉलीवूडचा असा एक खास फ्लेवरही टाकला आहे. या दोघांबरोबरच याचं श्रेय जातं ते देवगण कॅम्पचे मेंबर संकलक धर्मेंद्र शर्मा यांना. प्रत्येक पात्राला जिवंतपणा देण्याचं काम कपाडियांच्या संवादांनी फारच उत्तम केलेलं आहे, सिनेमातल्या तोफांपेक्षाही बहारदार संवादांनी टॉकीज दणाणून सोडलं. नुसत्या टाळ्या-शिट्या. सिनेमॅटोग्राफर केईको नाकाहारा यांच्या कॅमेऱ्यातून टिपलेला सिनेमा खूपच सुंदर दिसतो, त्यांच्या गाठीशी मेरी कॉम, इंदू सरकार सारख्या सिनेमांचा अनुभव आहे. कला दिग्दर्शनाचं काम- देवीचं मंदिर, राजगडावरचा वाडा, बाजारपेठ, इ. छानच, NYvfxwala आणि टीम यांचं काम तर खरच जबरदस्त, सजलाय सिनेमा त्यांच्यामुळं. लढाई हा सिनेमाचा अविभाज्य भाग, action director - रमझान बुलूत , Fight choreographer- माईक मूलर, Fight designer - दोल्गा देअरमन आणि टीम यांनी भन्नाट काम केलं आहे, प्रेक्षकांसाठी हे पाहणं म्हणजे मेजवानी आहे. रंगभूषाकारांनी ही छान काम केलं आहे. (सूर्याजी, शेलार मामा अन्य मावळे यांना मावळी पांढरा टिळा, महाराजांना चंद्रकोर आणि शिवगंध असतं तर look अजून खुलला असता.) नचिकेत बर्वे यांनी वेशभूषा विभागात चांगलं काम केलं आहे, याआधी त्यांनी 'कट्यार, काशीनाथ घाणेकर' या सिनेमामध्येही यासाठी उत्तम काम केलं आहे. (पण मला वाटतं पूर्णिमा ओक - स्वराज्यरक्षक संभाजी, फर्जंद, फत्तेशिकस्त च्या वेशभूषाकार यांनी यांत महारथ मिळवली आहे.) आणि आता कप्तानाबद्दल...नेहमीप्रमाणेच राऊत यांचं दिग्दर्शन उत्तमच. लोकमान्य, तान्हाजी जैसा आरंभ हैं प्रचंड तो आगे बढियाही होगा. आता त्यांनी स्वराज्य या शब्दाचं पेटंट घ्यायला हरकत नाही 😋.
या सिनेमामध्ये गाणी व background score हा पण तेवढाच महत्वाचा भाग आहे. संदीप शिरोडकर यांनी background score उत्तम केलेला आहे, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, दबंग, डर्टी पिक्चर सारखे दमदार सिनेमांना याआधी त्यांनी केले आहेत. शंकरा:मेहुल व्यास (जबरदस्त डान्स नंबर आहे हा) माय भवानी:अजय अतुल (Ajay- Atul)( नेहमीप्रमाणेच कडक, यांत "हे उदं उदं" हे ऐकताना विशेष छान वाटतं, अजय-अतुल आहेत म्हटल्यावर असं मराठी लोकसंगीत बाजाचं एखादं गाणं हवं होतं असं वाटतं) तिनक तिनक- मस्त रोमँटिक वाटतं , घमंड कर:सचेत-परंपरा हे गाणं डोक्यात घुमत राहतं, सगळ्यात जास्त याचाच प्रभाव पडतो ते याच्या चालीमुळं, "रा रा रा" ही तानाजी थीम ठरलीय, अनिल वर्मा यांचे शब्द आणि सचेत- परंपरा यांचे स्वर आणि संगीत सगळंच कडकडीत.(शंकरा या गाण्याच्या श्रेयनामावलीत जसं आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांच नाव आहे तसं घमंड कर श्रेयनामावलीत गणेश चंदनशिवे (Ganesh Chandanshive) यांचं नाव का नाही?) युरी सूरी- मिर्झाराजे जयसिंग, अंगद म्हसकर-मोरोपंत या नटांना खूपच कमी स्कोप आहे हे बघून जरा वाईट वाटलं. अजिंक्य देव-पिसाळ, शशांक शेंडे-शेलार मामा, देवदत्त नागे-सूर्याजी यांची कामं लक्षात राहण्याजोगी. कैलाश वाघमारे-चुलत्या व गीत्याचं पात्र करणारा या दोघांचं विशेष कौतुक. लुक केनी-औरंगजेब, एक उत्तम प्रयत्न. पद्मावती राव- जिजाऊ मासाहेबांच्या मूर्तिमंत करारीपणाचं दर्शन. शरद केळकर - युगप्रवर्तक शिवछत्रपतींची भावनिक छटा सुंदर पद्धतीनं दाखवली. पाहूनच मुजऱ्यासाठी मान लवते. उदयभान- सैफ (Saif Ali Khan) खणखणीत कामगिरी, (लंगडा त्यागीचा अनुभव. नवरदेवाच्या वेशात नाचतानाच फक्त खिलजीचा भास झाला.) काजोल- ढाण्या वाघाची वाघीण शोभलीय. जबरदस्त. अजय देवगणने (Ajay Devgan) तर नेहमीच्या सहजतेनंच भूमिका वठवली आहे. ९९ सिनेमांचा तगडा अनुभव. नादखुळा परफॉर्मन्स. (पण गणेश यादव- फर्जंद आणि अजय पुरकर-फत्तेशिकस्त मला राहून राहून आठवत होते.)
जीवंत बुद्धिबळातला उदयभानचा सहभाग, तो राठोड उदयभानपेक्षा उदयखान वाटेल याचा आटापिटा, कल्पनातीत नागीण तोफ, खऱ्या इतिहासापेक्षा घेतलेली लिबर्टी यागोष्टी बाजूला ठेवू पण असे ऐतिहासिक सिनेमे येण्याआधीच बोंबाबोंब का सुरू होते माहीत नाही? प्रसंग बदला, संवाद बदला; भावना दुखावल्या आहेत. भावना इतक्या तकलादू कशा काय असतात? खोटा/ विपरीत इतिहास दाखवला म्हणून शंखनाद. लोकहो Disclaimer नावाचा प्रकार आहे सुरुवातीला (कदाचित नवाबसाहेबांनी प्रीमियरला हे वाचलं नसावं) एकदा सेन्सर बोर्डानं दिली परवानगी झालं की मग! बाकीच्यांची लुडबूड काय कामाची? आधीच तयार झालेल्या धर्मांध वातावरणात निधर्मी देशात हा सिनेमा अजून धार्मिक तेढ निर्माण करतो आहे, अशी टीका मीडियानंही केली. मध्ययुगात फक्त सत्तासंघर्ष नव्हता, धर्माचा राजकारणावर तेवढाच प्रभाव होता. वर्तमानात लोकशाही असताना इतका प्रभाव आहे, राजेशाहीत का नसेल? एक वेगळा लेख लिहावा लागेल हा असा विषय आहे. असो...
पण एकूणच सिनेमा विशेष करून लढाई पाहताना लहानपणी ऐकलेल्या ओळी खूपच आठवत होत्या,
धर्मासाठी झुंजावे। झुंजोनी अवघ्यासी मारावे।
मारिता मारिता घ्यावे। राज्य आपुले।।
देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा।
मुलुख बडवावा की बुडवावा। धर्मसंस्थापनेसाठी।।
हर हर महादेव
🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻
पण एकूणच सिनेमा विशेष करून लढाई पाहताना लहानपणी ऐकलेल्या ओळी खूपच आठवत होत्या,
धर्मासाठी झुंजावे। झुंजोनी अवघ्यासी मारावे।
मारिता मारिता घ्यावे। राज्य आपुले।।
देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा।
मुलुख बडवावा की बुडवावा। धर्मसंस्थापनेसाठी।।
हर हर महादेव
🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻

छान लिहिलंय. आपली सगळीच मते पटत नाहीत. पण इतिहासावर आधारित म्हटले तरी अगदीच चांदोबा मधली कथा करू नये. तानाजीला सुपर हिरो करायच्या नादात त्याचा भाऊ सूर्याजी आणि शेलार मामा यांच्यावर अन्याय केला आहे. तसाच उदयभान वर सुद्धा. बारकाईने इतिहास वाचणारे नक्कीच सांगतील की उदयभान चारित्र्यवान देवभक्त म्हणून प्रसिद्ध होता.
उत्तर द्याहटवाअजून एकीकडे लिहिले होते तेच इथे लिहिते की इतपत ऐतिहासिक सिनेमे मनोजकुमार सुद्धा काढत होता. फक्त तो पात्रांना भगतसिंग गांधीजी अशी नावे देत नव्हता.
कपडे पट सांभाळणाऱ्या मंडळींचा अभ्यास सुद्धा कमी पडलाय. फक्त काजोल जॉर्जेट लेगिंग घालून दिसली नाही एवढे लै उपकार झाले!
धन्यवाद!
हटवा